
IPS Officer: एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ८८ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याचं नाव इंदरजित सिंह सिद्धू असं आहे. गेल्या दहा वर्षांपासून इंदरजित हे त्यांच्या सोसायटीसह आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करण्याचं काम करतात. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील असलेल्या गौरव गोयल यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता.