Gujarat: ८९ वर्षांच्या आजोबांची सततची सेक्सची मागणी; कंटाळून आजींनी मागितली मदत

सेक्सला नकार दिल्यास या व्यक्तीची प्रचंड चिडचिड व्हायची, त्यामुळे सगळा परिवार वैतागला होता.
Gujarat Old Couple
Gujarat Old CoupleSakal
Updated on

गुजरातमधल्या हेल्पलाईन क्रमांकावर एक फोन आला. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या या हेल्पलाईन नंबरवर एका ८७ वर्षीय महिलेने फोन केला होता. तिचं म्हणं ऐकून हेल्पलाईनमध्ये काम करणारेही चक्रावले. अशी कोणती समस्या तिने मांडली होती?

या ८७ वर्षी महिलेने सतत सेक्सची मागणी करणाऱ्या आपल्या ८९ वर्षीय पतीला कंटाळून फोन केला होता. आपण आजारी असल्याने सतत त्याच्याशी सेक्स करू शकत नाही त्यामुळे त्याच्यापासून सुटका मिळावी, अशी मागणी या ८७ वर्षीय महिलेने केली आहे. याबद्दल नवभारत टाईम्सने सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, अभयम या हेल्पलाईनकडे हा फोन आला होता. तिथल्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

अभयमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांमध्ये अनेक वर्षांपासून निरोगी संबंध होते. पण त्यानंतर एका वर्षांपूर्वी ही महिला आजारी पडली आणि ती अंथरुणाला खिळून राहिली. तिला हालचालही करणं अवघड जात आहे. आपला मुलगा आणि सून यांच्या मदतीने तिला चालावं लागतं. तिच्या पतीलाही या सगळ्याची कल्पना आहे, पण तरीही पती तिला सातत्याने सेक्स करण्यास भाग पाडतो.

या महिलेचा ८९ वर्षीय पती निवृत्त इंजिनीयर आहे. त्याने महिलेकडे सेक्सची मागणी केली आणि महिलेने नकार दिला की तो जोरजोरात आरडाओरडा करतो, चिडचिड करतो. मुलावरही ओरडतो. त्यामुळे हा सगळा प्रकार शेजारपाजाऱ्यांनाही कळतो. म्हणून परिवाराने हेल्पलाईन क्रमांकावर मदत मागितली. त्यानंतर हेल्पलाईनची टीम त्यांच्या घरी आली आणि त्यांनी पतीचं समुपदेशन केलं. तसंच त्याला सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्लाही दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com