8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Central Govt Employees Demand 3.83 Fitment Factor to Push Minimum Basic Salary Above ₹69,000: कर्मचारी संघटनांची अशी मागणी आहे की, ८ व्या वेतन आयोगात हे मूळ वेतन थेट ६९ हजार रुपयांपर्यंत वाढवले जावे.
Central Govt Employees

Central Govt Employees

esakal

Updated on

3.83 Fitment Factor Demanded: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. विविध राज्यांमध्ये यासंदर्भातील बैठकांचे सत्र सुरू आहे. नुकतीच वेतन आयोगाची एक महत्त्वाची बैठक चेन्नई येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांनी सरकारसमोर किमान मूळ वेतन ६९ हजार रुपये करण्याची मोठी मागणी लावून धरली आहे. यासाठी फिटमेंट फॅक्टर वाढवून ३.८३ इतका करण्यात यावा, असा प्रस्ताव संघटनांनी ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com