
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. जबलपूर शहरात आठवीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर एका १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याचा निकाल एक दिवस आधी आला होता. ज्यामध्ये तो नापास झाला होता. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. ही घटना शनिवारी माधोतल पोलीस स्टेशन हद्दीतील भोला नगर परिसरात घडली.