ममतांच्या रॅलीत पंतप्रधानपदाचे 9 दावेदार : अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ''ममता बॅनर्जी यांच्या रॅलीमध्ये पंतप्रधानपदाचे 9 दावेदार आहेत. देशातील 100 कोटी जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिशी आहे. 20-25 नेते एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखू शकत नाही.'' 

ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या रॅलीमधील 20-25 नेते एकत्र आले होते. या रॅलीमध्ये एकत्र आलेले 20-25 नेतेमंडळी मोदींना रोखू शकत नाही. पंतप्रधान मोदींना 100 कोटींच्या जनतेचे पाठिंबा आहे. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे आयोजित केलेल्या विरोधकांच्या रॅलीमध्ये पंतप्रधानपदाचे 9 दावेदार आहेत, असे शहा म्हणाले.

अमित शहा म्हणाले, की तृणमूल काँग्रेस भाजपच्या वाढीमुळे चिंताग्रस्त आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपच्या रथरात्रेला परवानगी नाकारली. ममता बॅनर्जी आमच्या यात्रा थांबवू शकतात. मात्र, त्या जनतेच्या मनातून काढू शकत नाही. 
 
Web Title: 9 contenders for PM post at Mamata rally says BJP President Amit Shah