जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात 9 जणांचा मृत्यू तर 25 जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोनभद्र येथील घोरावल कोतवाली परिसरातील उभभा गावात आज (ता.27) ही घटना घडली. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारानंतर गावात पोलिस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

हा गोळीबार गावचा सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गावाजवळील रुग्णालयात मृत आणि जखमींना आणण्यात आलं. यावेळी नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 100 एकर जमिनीसाठी जुन्या वैमन्यस्यातून दोन गटांमध्ये आधी वाद झाला त्यानंतर गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 died 25 injured in firing between two groups over a land dispute