

Scientific Analysis Reveals True Identity of 12th-Century Dhar Idol as Goddess Gayatri
sakal
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार येथे सापडलेली आणि सध्या भोपाळच्या संग्रहालयात ठेवलेली बाराव्या शतकातील लाल वाळूच्या दगडातील प्रसिद्ध मूर्ती ही सरस्वती देवीची नसून, गायत्री देवीची असल्याचे अत्याधुनिक तांत्रिक तपासणीतून स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेश सरकारच्या ‘डिजिटल हेरिटेज मिशन’अंतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासामुळे तब्बल ९०० वर्षांपासूनचा ऐतिहासिक समज बदलला आहे. इतिहासकार आणि पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते, मूर्तीच्या आयकॉनोग्राफीचे (देवतांच्या प्रतिमाशास्त्राचे) नव्याने केलेले वैज्ञानिक विश्लेषण पुरातत्त्व क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे.