फसवणूक 9 हजार कोटींची; जप्ती मात्र 13 हजार कोटींची

फसवणूक 9 हजार कोटींची; जप्ती मात्र 13 हजार कोटींची

नवी दिल्ली : नऊ हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढणारे विजय मल्ल्या यांनी शुक्रवारी ट्‌विटरवर डीआरटीच्या कारवाईवर आगपाखड केली आहे. एकामागून एक चार ट्‌विट करत म्हटले की, बॅंकांकडून 9 हजार कोटींची फसवणुकीचा दावा असताना आतापर्यंत 13 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. हे किती दिवस चालणार आहे आणि न्यायपूर्ण आहे का? 

63 वर्षीय मल्ल्या हे मार्च 2016 रोजी भारतातून फरार झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी म्हटले की, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (डीआरटी) चे अधिकारी दररोज माझी मालमत्ता जप्त करत आहेत. ही मालमत्ता 13 हजार कोटींची आहे. बॅंकेने व्याजासह 9 हजार कोटींची फसवणूक केल्याचा दावा केला असून, बॅंकेचे दावे अजूनही पडताळणीच्या पातळीवर आहेत. विजय मल्ल्या यांनी दुसऱ्या ट्‌विटमध्ये म्हटले की, दररोज सकाळी मी जेव्हा उठतो तेव्हा डीआरटीचा अधिकारी माझी मालमत्ता ताब्यात घेतल्याची बातमी कळते. आतापर्यंत 13 हजार कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भारतात एवढी मोठी मालमत्ता जप्त करूनही भारतीय बॅंकांनी इंग्लंडमध्ये आपल्या वकिलामार्फत माझ्याविरुद्ध आक्रमकपणे खटले चालवण्याचे खुली परवानगी दिली आहे.

जनतेचा हा पैसा वकिलाच्या फीपोटी खर्च करण्यामागे कोण जबाबदार आहे, असा सवाल भारतीय बॅंकांना केला आहे. शेवटच्या ट्‌विटमध्ये म्हटले की, इंग्लंडमध्ये बॅंकांच्या वकिलांनी माझ्या एचएमआरसीकडे कायदेशीर कर (लेजिमेंट टॅक्‍स) भरणा करण्यास आक्षेप घेतला आहे. भारतीय बॅंकांना इंग्लंडमधून माझा पैसा आहे. मात्र, इंग्लंडचा कर भरताना आक्षेप घेतात, असा प्रश्‍नही केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com