गोवा - केरी येथे 9.37 लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पोलिस व अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत केरी - सत्तरी येथे बेकायदा मद्यसाठा वाहनासह जप्त केला.

केरी (गोवा) : पोलिस व अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत केरी - सत्तरी येथे बेकायदा मद्यसाठा वाहनासह जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत सुमारे 9.37 लाख रुपये आहे. यामध्ये विविध बनावटीच्या मद्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. हा मद्यसाठा गोव्यातून कर्नाटक येथे नेण्यात येत होता. पोलिसांनी वाहन अडवताच चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी हा मद्यसाठा जप्त करून अबकारी खात्याकडे दिला असून या प्रकरणामागील मुख्य संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: 9.37 lakhs illegal liquor seized in keri goa