शेवटची आंघोळ घालताना 'ते' झाले जीवंत...

gujjar family
gujjar family

जयपूर (राजस्थान): घरामध्ये दिवाळीचे आनंदी वातावरण... विविध पदार्थांची रेलचेल... सर्वजण आनंदात असतानाच 95 वर्षांच्या आजोबांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबामध्ये दुःखात बुडाले... डॉक्टरांनी मृत घोषीत केले... शेवटच्या प्रवासाची तयारी सूरू होती... आजोबांना शेवटची आंघोळ घालायला सुरवात केली अन् चक्क ते उठून बसले.

झुंनझुनु जिल्ह्यातील खेत्री तालुक्यात असलेल्या गुज्जर कुटुंबामध्ये हा प्रकार घडला. बुद्ध राम गुज्जर (वय 95) यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी घरी येऊन आजोबांना तपासले असता त्यांनीही मृत्यू झाल्याचे सांगितले.

बुद्ध राम गुज्जर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे सर्व नातेवाईकांना याबाबतची माहिती कळविण्यात आली. विविध ठिकांणांवरून नातेवाईक गोळा झाले. कुटुंबियांनी बुद्ध राम गुज्जर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. कुटुंबियांमधील सदस्यांनी डोक्याची केस काढले. सर्वजण दुःखात बुडाले होते. तिरडीसह अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण झाली होती. आजोबांना शेवटची आंघोळ घालण्यासाठी सर्वजण एकत्र आले. आंघोळीचे पाणी त्यांच्या शरीरावर ओतल्यानंतर काही क्षणातच ते उठून बसले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला व दुःखमय झालेले वातावरण आनंदी झाले, अशी माहिती त्यांचा मोठा मुलगा बालू राम (वय 65) यांनी दिली.

आपला मृत्यू झाल्यामुळे एवढे नातेवाईक गोळा झाल्याचे आजोबांना समजल्यानंतर ते म्हणाले, 'मला काही झालेच नव्हते. मी फक्त झोपलो होतो. असो, सर्व नातेवाईक एकत्र आले तर आपण मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करू, असे म्हटल्यानंतर कुटुंबामध्ये आनंदाला उधान आले आहे.'

'माझ्या वडिलांच्या शरीराची हालचाल किती तरी वेळ बंद होती. डॉक्टरांनी सुद्धा त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीच केले होते. पण, काही असो, आमचे वडील जिवंत आहेत. काहीतरी जादूच घडली आहे. आम्ही यंदाची दिवाळी स्पेशल दिवाळी म्हणून साजरी करणार आहोत,' असे त्यांचा छोटा मुलगा रणजीत (वय 55) यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com