Video: बाळाला कडेवर घेऊन ही आई करते फूड डिलिव्हरी; Zomatoने घेतली दखल|Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral

Video: बाळाला कडेवर घेऊन ही आई करते फूड डिलिव्हरी; Zomatoने घेतली दखल

सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अचंबित करणाऱ्या असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक महिला ही तिच्या बाळाला कडेवर घेऊन फू़ड डिलिव्हरी करतेय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (a female Zomato delivery agent carries her baby girl And boy during the food delivery video goes viral)

हेही वाचा: IND vs PAK : पाकिस्तानी रिझवान तयारीला लागला रे... नेट्समध्ये सरावाचा Viral Video

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या लहान बाळाला कडेवर घेऊन फूड डिलिव्हरी करताना दिसतेय. सोबतच तिच्यासोबत आणखी पाच सहा वर्षाचा मुलगा पण व्हिडिओमध्ये दिसतोय. हि महिला झोमॅटोसाठी फू़ड डिलिव्हरीचं काम करते.

फुड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला तिचं कौतुक वाटतं आणि तो तिचा व्हिडिओ करतो. घरी कुणी मुलांना सांभाळायला नसल्याने दोन्ही मुलं सोबत घेऊन काम करावे लागते, असं ती महिला सांगते.

हेही वाचा: Video Viral : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलने मारहाण; महिलेवर कारवाईची मागणी

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यनंतर याची दखल झोमॅटोने घेतली असून या महिलेचा पत्ता झोमॅटोने विचारला होता आणि या महिलेला आणि तिच्या मुलांना मदत करण्याचेही आश्वासनही दिले होते. सध्या नेटकरी यावर अनेक भावनिक प्रतिक्रिया देत असून हा व्हिडिओ शेअर करत आहे.

Web Title: A Female Zomato Delivery Agent Carries Her Baby Girl And Boy During The Food Delivery Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..