Uttar Pradesh: योगींच्या राज्यात शाळा सुसाट! आता A फॉर ॲपल नाही; तर 'A' फॉर अर्जून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP School

Uttar Pradesh: योगींच्या राज्यात शाळा सुसाट! आता A फॉर ॲपल नाही; तर 'A' फॉर अर्जून

प्रत्येकाने शाळेत A, B, C, D चे धडे घेतलेच असावे.  तेव्हा ABCD शिकताना 'A' फॉर Apple और 'B' फॉर बॉल शिकवले जायचे मात्र आता यात बदल होणार आहे कारण आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक असं स्कूल आहे जिथे इंग्लिश शब्दांच्या अर्थामध्ये मोठा बदल केलाय. आता या शाळेत 'A' फॉर Apple नाही तर 'A' फॉर अर्जून आणि B' फॉर बलराम शिकवले जाणार. सध्या या शाळेची जोरदार चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये अमीनाबाद इंटर कॉलेजमध्ये इंग्रजी वर्णमालावरुन ऐतिहासिक आणि पौराणिक ज्ञान प्रदान केले जाणार. स्कूलच्या प्रिंसिपलनी सांगितले की याद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

इंग्रजी वर्णमालासोबत आता हिन्दी वर्णमालावरही हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. हिंदी वर्णमालामध्ये अक्षरे जास्त असतात हे अवघड जाईल, असं ही ते म्हणाले.

हेही वाचा: Viral Love Story: ड्रायव्हरनं टाकला असा गियर की करोडपती मुलगी पडली प्रेमात

अमीनाबाद इंटर कॉलेजनी छापलेल्या या पुस्तकांमागे इतिहास आणि पुराणाविषयी विद्यार्थ्यांंना माहिती देणे ही संकल्पना आहे. अमीनाबाद इंटर कॉलेज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये स्थित आहे जे 125 वर्ष जुने आहे.

सध्या सोशल मीडियावर या कॉलेजची जोरदार चर्चा असून नेटकरी या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.