अँटनींचा PK वर हल्ला; म्हणाले, ...तर काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारा

A. K. Anthony said, Accept the leadership of the Congress
A. K. Anthony said, Accept the leadership of the CongressA. K. Anthony said, Accept the leadership of the Congress

सकाळ डिजिटल टीम

गांधी घराण्याशिवाय काँग्रेस टिकणार नाही. बदल घडवून आणायचा असेल तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारा. काँग्रेसला बगल देऊन तुम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध करून देणार नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचे अस्तित्व कधीच संपणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी (A. K. Anthony) म्हणाले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांचे हे विधान आले आहे. (A. K. Anthony said, Accept the leadership of the Congress)

देशातील सर्वांत जुन्या पक्षाला नेतृत्वाची गरज आहे. सामूहिक इच्छाशक्तीशिवाय संघटनात्मक स्तरावर असलेल्या खोल समस्या सोडवता येणार नाहीत, असे प्रशांत किशोर (prashant kishor) म्हणाले होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांना पक्षात सामील होण्यासाठी आणि २०२४ साठी एम्पॉर्ड ॲक्शन ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, प्रशांत किशोर यांनी त्यांच्याकडे एक निश्चित जबाबदारी असेल असे सांगून काँग्रेसमध्ये येण्यास नकार दिला होता.

A. K. Anthony said, Accept the leadership of the Congress
राहुल गांधींच्या उदासीनतेने बिघडले काम! PK गोटातून नवी माहिती

विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा सविस्तर अहवाल काँग्रेस (Congress) नेतृत्वाला दिला होता. प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यात दोन आठवड्यांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा मीडियात बऱ्याच दिवसांपासून होती.

प्रशांत किशोर यांनी सांगितलेल्या रणनीतीनंतरच काँग्रेसनेही निवडणुकीसंदर्भात सक्षम कृती गट स्थापन केला होता. या सगळ्यात १३ मेपासून राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित केले जात आहे, ज्यामध्ये देशभरातून सुमारे ४०० काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते एकत्र येणार आहेत.

काँग्रेसमध्ये एकमत नव्हते

प्रशांत किशोर यांना काँग्रेसबद्दल दोन शंका होत्या. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस (Congress) नेतृत्वात मोठ्या बदलासाठी तयार नव्हती. पीकेंनी प्रियांका गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे किंवा गांधी नसलेल्या नेत्याला कमांड द्यावी, असे म्हटले होते. यावर काँग्रेसमध्ये एकमत नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com