
समलैंगिक विवाह, सोलोगॅमी विवाह पद्धतीचा अलीकडे भलताच ट्रेंड सुरू आहे. साधारण विवाहाबद्दल बोलायचे झाल्यास लग्नाला तयार असणारा एक मुलगा आणि एक मुलगी आणि त्यांचे नातलग असतात. मात्र एकाच मंडपात नवरदेवाने दोन लग्न केल्याचं तुम्ही कधी ऐकलंत का? या पठ्ठ्याने चक्क एकाच मंडपात थेट दोन मुलींशी विवाह केलाय. त्याच्या अजब लग्नाचा गजब व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (A Man weds two girls at a time video viral on social media)
नवरदेवाचा एकाच वेळी दोन मुलींच्या लग्नाचा विवाहसोहळा अल्जेरियात पार पडला. दोन्ही मुलींच्या परस्पर समजुतीतून हे लग्न झाल्याचे समजते आहे. या पठ्ठ्याचं लग्नंही साधंसुधं नव्हतं. दोन नवरी आणि एकुलता एक हा नवरदेव गाडीतून पाऊल बाहेर काढताच बंदूकीच्या फैऱ्यांनी तिघांचं जंगी स्वागत झालं.
दोघींच्या हातात हात घालून हा पठ्ठा आलिशान बसलेला तुम्हाला दिसेल. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. एक्स्ट्रा मॅरेटल अफेयर करणाऱ्याला हा पठ्ठा समजुत करून दोन मुलींशी एकाच मंडपात लग्न तर करायला तर सांगत नाही ना असंही हा व्हिडिओ बघून अनेकांना वाटू शकतं. त्याच्या अजब लग्नाचा गजब व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.