Video : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्याच्या अंगावर फेकण्यात आला तुटलेल्या खुर्चीचा भाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar

Video : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्याच्या अंगावर फेकण्यात आला तुटलेल्या खुर्चीचा भाग

मुख्यमंत्र्यांच्या अंगावर तुटलेल्या खुर्चीचा भाग फेकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगावर खुर्चीचा तुटलेला भाग फेकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सुदैवाने हा भाग मुख्यमंत्र्यांना लागला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सध्या समाधान यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान औरंगाबादमधील काही संतप्त नागरिकांनी तुटलेल्या खुर्चीचा भाग नितीश कुमार यांच्या बाजूने भिरकावला.

औरंगाबादच्या कांचनपूरमध्ये हा धक्कादायकप्रकार घडला आहे. समाधान यात्रेदरम्यान नितीशकुमार सोमवारी सासाराम आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर होते.

यादरम्यान ते जिल्ह्यातील बरुण ब्लॉकच्या कांचनपूर पंचायतीमध्ये पंचायत सरकार भवनाच्या उद्घाटनासाठी आले होते.

येथे लोकांना मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समस्या सांगायच्या होत्या. मात्र सुरक्षा कर्मचारी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही.

यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी तेथे गोंधळ घालत खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली.

दरम्यान, गर्दीतील एका व्यक्तीने समोरून जाणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत तुटलेल्या खुर्चीचा तुकडा फेकला. जो नितीश कुमार यांच्या अगदी जवळून गेला. यात नितीश कुमार थोडक्यात बचावले. या घटनेमुळे येथे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.