
Sextortion : म्हातारपणासाठी जोडीदार शोधण पडलं महागात; सेक्स व्हिडिओमुळे बसला लाखोंचा गंडा
Sextortion News : मुंबईत एका 65 वर्षीय विधूर पुरूषाला सेक्स व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत 60 लाखांना गंडवल्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वृद्धाने गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
या वृद्धाने मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी केली होती. त्यानंतर एका तरूणीने या वृद्धाचा नंबर घेतला आणि व्हिडिओ कॉलदरम्यान सेक्स व्हिडिओ रेकॉर्ड केला.
ही तरूणी एवढ्यावरच न थांबता तिने पीडित वृद्धाला रेकॉर्ड केलेला व्हिडिओ ओळखाच्या लोकांना आणि नातेवाईकांना पाठवेल असे सांगत ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित वृद्ध व्यक्ती एकाकीपणामुळे त्रस्त होती. यामुळे ते उतारवयात जोडीदाराचा शोध घेत होते. यासाठी त्यांनी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी केली होती.
नोंदणीनंतर एका महिलेने वृद्धाशी चॅट केले तसेच दोघांनीही एकमेकांचे फोननंबर शेअर केले. त्यानंतर अनेकदा दोघांमध्ये फोनवर संभाषण झाले. अशाच एका व्हिडिओ कॉलदरम्यान महिलेने तिचे कपडे काढून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यानंतर तिने वृद्धालाही असेच करण्यास सांगितले.
त्यानुसार वृद्धानेही स्वःचे कपडे काढले तसेच महिलेच्या सांगण्यानुसार सर्वकाही करण्यास सुरूवात केली. यासर्वामध्ये महिलेने हा सर्वप्रकार रेकॉर्ड करत काही दिवसांनी पीडित वृद्धाला ब्लॅकमेल करत पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली.
पैसे न दिल्यास रेकॉर्ड केलेला व्हिडिओ नातेवाईकांना तसेच ओळखीच्या व्यक्तींना पाठवण्याची धमकी दिली. समाजात तसेच नातेवाईकांमध्ये होणाऱ्या बदनामीच्या हेतुने वृद्धाने काही रक्कम महिलेच्या खात्यावर 60 लाख ट्रान्सफर केले.
यानंतर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्धाने अखेर पोलिसांकडे धाव घेत सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला. या तक्रारीनंतर पोलीस व्हॉट्सअॅप नंबर आणि बँक खात्याच्या आधारे महिलेचा शोध घेत आहे.