LTTE Prabhakaran Alive : प्रभाकरन जिवंत आहे; तमिळ नेत्याचा धक्कादायक दावा

योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल असे नेदुमारन यांनी म्हटले आहे.
ltte leader prabhakaran
ltte leader prabhakaran Sakal

LTTE Prabhakaran Alive : लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख (LTTE) वेलुपिल्लई प्रभाकरन याच्याबाबत तमिळ नेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ltte leader prabhakaran
Sadabhaou Khot : पवार आत्मचरित्रात करतात अदानींचं कौतुक; ओसाड गावचे पाटील म्हणत सदाभाऊंचा घणाघात

वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी तमिळनाडूच्या तंजावरमध्ये एक निवेदन जारी करून हा दावा केला आहे.

प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करत योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल असे नेदुमारन यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी तामिळनाडू सरकार, पक्ष आणि तामिळनाडूतील जनतेला प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आपण प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही या नेत्याने म्हटले आहे.

ltte leader prabhakaran
Chinchwad By Election : "महाविकास आघाडीचं सरकार..."; आदित्य ठाकरेंनी सांगितली जनतेची 'मन की बात'

2009 मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, आता प्रभाकरनबाबत करण्यात आलेल्या या दाव्याने खळबळ उडाली असून, प्रभाकरन लवकरच तामिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे. जगातील तमाम तमिळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा द्यावा असे आवाहनही नेदुमारन यांनी केले आहे.

ltte leader prabhakaran
Threat Call : मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवू; मध्यरात्री मुंबईच्या सहआयुक्तांना फोन

प्रभाकरनची २००९ मध्ये झाली होती हत्या

लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. 2009 मध्ये श्रीलंकन ​​लष्कराने लष्करी कारवाई सुरू केली होती, ज्यात प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ltte leader prabhakaran
SAKAL Investigative : कुंभ- साधुग्रामसाठी उरली नाही जागा; त्र्यंबकेश्‍वरमध्ये ‘प्लॉटिंग'चा धंदा तेजीत!

वेगळ्या तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी झाली होती LTTE ची स्थापना

  • लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTTE ही श्रीलंकेची दहशतवादी संघटना असून. तामिळींसाठी वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. वेलुपिल्लई प्रभाकरन हा या संघटनेचा प्रमुख होता.

  • 80 च्या दशकानंतर एलटीटीईला अनेक देशांकडून पाठिंबा मिळू लागला आणि याची ताकद वाढत गेली. 1985 मध्ये,श्रीलंका सरकारने तमिळ बंडखोरांमध्ये शांतता चर्चेचा पहिला प्रयत्न केला, जो अयशस्वी झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com