Justice Yashwant Vermaesakal
देश
Yashwant Verma : न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरात लागलेल्या आगीत कचऱ्यासारखा जळाला नोटांचा ढीग; व्हिडिओ आला समोर
Trending Video: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी इतकी रोकड कशी आली याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पण त्याआधी आगीत नोटाची बंडले जळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरात आग लागल्यानंतर नोटांच्या बंडलांचा ढीग जळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जळालेल्या नोटा स्पष्टपणे दिसत आहेत. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी इतकी रोकड कशी आली याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पण त्याआधी आगीत नोटाची बंडले जळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. एका न्यूज वेबसाईटवर हा शेअर करण्यात आला आहे.

