VIDEO: करिअरबद्दल चिमुकल्याची भन्नाट कल्पना; हसू आवरणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIRAL VIDEO OF CHILD
VIDEO: करिअरबद्दल चिमुकल्याची भन्नाट कल्पना; हसू आवरणार नाही

VIDEO: करिअरबद्दल चिमुकल्याची भन्नाट कल्पना; हसू आवरणार नाही

Viral Video of Child: लहान पोरं जितकी क्यूट असतात तितकीच छपरी असतात. त्यांचा छपरीपणा सर्वांनाच आवडतो. ही इवलीशी बाळं नकळतपणे अशा गंमती करतात की ते पाहून पोट धरून हसायला होतं. अशाच एका लहान मुलाचा (Child) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आणि त्याच्या आईचा अतिशय गमतीदार संवाद आहे. खासकरून इंजिनियर (Engineer) होण्याबद्दलचा त्याचा युक्तिवाद ऐकला तर स्वतः इंजिनियरसुद्धा स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत.

व्हायरल व्हिड़ीओमध्ये एका घरामध्ये एक आई (Mother) तिच्या लहान मुलाचा अभ्यास (study) घेत आहे. परंतु या महाशयांना अभ्यास करायचाच नाही. बिचारी आई त्याला खूप समजावते. पण या राजांना तिचं ऐकायची इच्छाच नाही. उलट ते भोंगा पसरतात. या मुलाला आई शाळेचं महत्त्व सांगते.

हेही वाचा: Video: चिमुकलीच्या शिवगर्जनेनं अवघा महाराष्ट्र दुमदुमला!

तेव्हा तो आईला रडतच म्हणतो, “शाळेत तर अभ्यास करायला लागतो ना?”

त्यावर आई त्याला समजावताना म्हणते की, “तू तर फौजी, पोलीस बनायचंय म्हणतो ना? मग अभ्यास तर करावा लागेल.”

तेवढ्यात मुलगा क्षणाचा विलंब न करता म्हणतो, “मी इंजिनिअर बनणार. इंजिनिअर तर अभ्यासाने नाही बनतं ना!”

त्याच्या प्रश्नानं चकीत झालेली आई त्याला प्रतिप्रश्न करते, “मग इंजिनिअर कसे बनतात?”

त्यावर तो उत्तरतो, “अभ्यासाशिवाय बनतात.”

हेही वाचा: VIDEO : बुमराहच्या फटकेबाजीचं 'सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन!

आता या मुलाचं उत्तर ऐकून त्याच्या आईलाही हसू आवरता आलं नाही. दरम्यान या चिमुकल्याचं ‘इंजिनिअर बनायला अभ्यास करायला लागत नाही,’ हे वाक्य ऐकलं तर तोपण बिचारा हसून हसून वेडे होतील.

@ipskabra या इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram) या चिमुकल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top