Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी उरले फक्त चार दिवस; स्वतःच करा 'हे' बदल
Central Government: भारतामध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपल्या आधार कार्डच्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी मोफत सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी १४ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
नवी दिल्लीः बारा अंक असलेलं आधार कार्ड ही आपल्या देशातील सर्वांची ओळख आहे. आपलं बँक खातं उघडायचं असेल किंवा टॅक्स फाईल करायचं असेल अथवा कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.