'आधार' लिंकिंगसाठी पुढील मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

मोबाईल क्रमांक, बँक खाते आधारलिंक करणे केंद्र सरकारकडून बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर गॅस सिलिंडरचे अनुदान यांसह विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारक्रमांक अनिवार्य करण्यासंबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

नवी दिल्ली : आधारक्रमांक पॅनकार्डला लिंक करण्यासाठी यापूर्वी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) पॅनकार्डला आधारक्रमांक लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत पॅनक्रमांक आधारशी लिंक करता येणार आहे. 

मोबाईल क्रमांक, बँक खाते आधारलिंक करणे केंद्र सरकारकडून बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर गॅस सिलिंडरचे अनुदान यांसह विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारक्रमांक अनिवार्य करण्यासंबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विविध सेवांना आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर सरकारने अतिरिक्त दोन महिने वाढवून ही मुदत जूनपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा एकदा ही मुदत वाढविण्यात आली असून, 31 मार्चपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. 

Web Title: Aadhar Linking time extended till next march