Shraddha Murder Case : आफताबचं क्रूरकृत्य आणि Johny Depp च्या घटस्फोटाचा खटला; कबुलीतून कनेक्शन उघड

आपण या चौकशीसाठी आणि तपासादरम्यान होणाऱ्या प्रश्नोत्तरांसाठी स्वतःला तयार करत असल्याचंही आफताबने सांगितलं.
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal
Updated on

श्रद्धा वालकरचं खून प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. या खुनाचा मुख्य आरोपी आफताब अमीन पुनावाला याची नार्को टेस्ट नुकतीच पार पडली आहे. यामध्ये त्याने अनेक खळबळजनक खुलासे केले असून तपास आणि चौकशीसाठी आपण खूप आधीपासून तयारी करत असल्याचंही आफताबने सांगितलं.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : मला सोडायचा हट्ट केला म्हणून मारून टाकलं; क्रूरकर्मा आफताबची कबुली

आपल्याला श्रद्धा वालकरच्या खुनाबद्दल कोणताही पश्चाताप होत नाहीय, असं आफताबने आपल्या नार्को टेस्टदरम्यान सांगितलं आहे. तसंच आपण या चौकशीसाठी आणि तपासादरम्यान होणाऱ्या प्रश्नोत्तरांसाठी स्वतःला तयार करत असल्याचंही आफताबने सांगितलं. या सगळ्यादरम्यान स्वतःला शांत कसं ठेवावं, याचीही आधीपासूनच तयारी करत असल्याचं आफताबने सांगितलं.

Shraddha Murder Case
Aftab Shraddha Case: "बुद्धीबळाचा डाव अन्.. " श्रद्धाची हत्या करणारा आफताब जेलमध्ये करतो तरी काय?

डीएनए वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आफताबने काही जुन्या गुन्ह्यांबद्दल माहिती घेतली, तसंच काही गुन्हेगारी खटल्यांची सुनावणी कशी चालते, तेही पाहिलं. जेव्हा पोलीस आपल्याला ताब्यात घेतील, तेव्हा आपण कसं वागायचं, हे शिकण्यासाठी आपण ही माहिती गोळा केल्याचं आफताबने सांगितलं. यासाठी आफताबने जॉनी डेप अँबर हर्डच्या घटस्फोटाच्या सुनावणीची मदत घेतली. तपासणीदरम्यान घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळायची हेही त्याने जाणून घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com