Aftab Shraddha Case: "बुद्धीबळाचा डाव अन्.. " श्रद्धाची हत्या करणारा आफताब जेलमध्ये करतो तरी काय?

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आफताबला ठेवण्यात आले आहे.
 aftab poonawalla playing Chess game
aftab poonawalla playing Chess gameesakal

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावाला याची दिल्ली पोलिसांनी पॉलिग्राफिक टेस्ट आणि नार्को टेस्ट केली. या दोन टेस्टमधून श्रद्धा हत्या प्रकरणातील अनेक खुलासे झाले. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आफताबला ठेवण्यात आले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, आफताब जेलमध्येही चाली खेळत असतो. असे समजले आहे. (Shraddha Murder case aftab poonawalla playing Chess game tihar jail )

आफताब सध्या तिहार जेलमध्ये आहे. गेल्या दोन आठवड्यापासून हे प्रकरण सुरू आहे. यासर्वादरम्यान, आफताबच्या आवडी निवडी समजल्या आहेत. यामध्ये आफताबला बुद्धीबळ खेळायला आवडतं असल्याचे समजले.

तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅरेक क्रमांक-4 मध्ये बंद असलेला आफताब वेळ घालवण्यासाठी तासन्तास बुद्धिबळ खेळतो. आफताब कोणाशीही बोलत नाही, परंतु जेव्हा हे दोन चोर बुद्धिबळ खेळत असतात तेव्हा तो एकटक बुद्धिबळकडे पाहत राहतो. खेळादरम्यान, कोणालाही तो मदत करत नाही. तो त्याच्या बॅरेकमध्ये एकटाच बुद्धिबळाचा पट लावतो.

 aftab poonawalla playing Chess game
Viral: आठवी नववीतल्या मुलांच्या बॅगेत कंडोम, सिगारेट अन् ....

आफताबने केली श्रद्धाची हत्या

श्रद्धा मुंबईत मालाड येथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती, त्यावेळी तिची आणि आफताबची ओळख झाली. दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले. श्रद्धाच्या या वर्तनाला घरून विरोध होऊ लागला. या विरोधाला उत्तर म्हणून श्रद्धा आणि आफताब महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहू लागले. बहुराष्ट्रीय कंपनीत श्रद्धाची नोकरी सुरू होती. आफताब पण काम करत होता. पण दिल्लीत आल्यापासून दोघांमध्ये अधूनमधून वाद होत होते. वाद वाढला तर प्रत्येकवेळी आफताब आत्महत्या करेन अशी धमकी द्यायचा.

मी आत्महत्या केली तर तू आणि तुझ्या घरच्यांना पोलीस अटक करतील असे सांगून आफताब श्रद्धाला घाबरवत होता. तसेच श्रद्धाला मारहाण करणे, तिच्या चेहऱ्यावर जखमा करणे, श्रद्धाच्या पाठीवर सिगरेट विझविणे, श्रद्धाला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार आफताब करत होता.

 aftab poonawalla playing Chess game
Shraddha Murder Case : मला सोडायचा हट्ट केला म्हणून मारून टाकलं; क्रूरकर्मा आफताबची कबुली

एक दिवस वाद सुरू असताना गळा आवळून आफताबने श्रद्धाची हत्या केली. नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. हे तुकडे घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले. यानंतर पुढील 5-6 महिन्यांत टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आफताबने श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com