'आप'च्या 'त्या' आमदारांचा फैसला होणार आज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

निवडणूक आयोग आणि आपच्या या आमदारांचे याप्रकरणी 28 फेब्रुवारीला न्यायालयात आरोप-प्रत्यारोप पूर्ण झाले होते. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला. आता याप्रकरणाचा आज निकाल देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाच्या (आप) ज्या आमदारांची सदस्यता रद्द केली. त्या सर्व आमदार आणि 'आप'साठी आजचा महत्वाचा दिवस ठरणार आहे. या आमदारांकडून सदस्यता रद्द करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाकडून सुनावणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

Arvind kejriwal

निवडणूक आयोग आणि आपच्या या आमदारांचे याप्रकरणी 28 फेब्रुवारीला न्यायालयात आरोप-प्रत्यारोप पूर्ण झाले होते. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला. आता याप्रकरणाचा आज निकाल देण्याची शक्यता आहे. आपच्या या सर्व आमदारांवर लाभाचे पद उपभोगत असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाने या सर्व आमदारांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले. निवडणूक आयोगाचा हा निर्णय घटनाबाह्य आहे, असे म्हणत या निर्णयाला आपच्या या अपात्र आमदारांकडून आव्हान देण्यात आले. ''आम्हाला आमची बाजू मांडू देण्यात आली नाही''. मात्र, या आमदारांनी केलेले आरोप खोडून काढत निवडणूक आयोगाने त्यांना योग्य वेळ दिल्याचे सांगितले.    

दरम्यान, अपात्रताप्रकरणी न्यायालयाकडून आज निर्णय येणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर विधानसभेच्या 20 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Aam Aadmi Party 20 MLA hearing is today by Delhi High Court