Liquor Policy Case : मद्यधोरण गैरव्यवहार भाजपचाच : संजय सिंह

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात जामिनावर मुक्तता झालेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज दावा केला, की हा गैरव्यवहार भाजपने केला आहे.
Liquor Policy Case
Liquor Policy Casesakal

नवी दिल्ली : मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात जामिनावर मुक्तता झालेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज दावा केला, की हा गैरव्यवहार भाजपने केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे षड्‌यंत्राचे बळी ठरले असून त्यांच्याविरुद्ध कट रचून त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले.

संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. संजय सिंह म्हणाले की, मगुंटा रेड्डी या व्यक्तीने तीन वक्तव्ये दिली तर त्यांचे पुत्र राघव मगुंटा यांनी सात वक्तव्ये दिली. १६ सप्टेंबरला ‘ईडी’ने मगुंटा रेड्डींना अरविंद केजरीवाल यांच्या परिचय असल्याबद्दल विचारले होते.

त्यावेळी चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीशी संबंधित मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांच्या भेट झाल्याचे मगुंटा रेड्डी यांनी सांगितले होते. मात्र, मुलाला अटक झाल्यानंतर मगुंटा रेड्डी यांनी आपले वक्तव्य बदलले.

दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत जे आरोपी पकडण्यात आले होते, त्यांनी जोपर्यंत केजरीवाल यांचे नाव घेतले नाही तोपर्यंत त्यांची वक्तव्ये ‘ईडी’ने विश्वासार्ह मानली नाहीत. मात्र, केजरीवाल यांचे नाव घेताच आरोपींची वक्तव्ये ‘ईडी’ने मान्य केली, असा टोलाही संजय सिंह यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com