आप, लोक इन्साफ आघाडीची उमेदवारांची घोषणा

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

चंडीगड - पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष यांच्या आघाडीने आज आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली. फगवाडा आणि मध्य लुधियाना या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

चंडीगड - पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष यांच्या आघाडीने आज आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली. फगवाडा आणि मध्य लुधियाना या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

आपचे नेते संजयसिंग आणि लोक इन्साफ पक्षाचे नेते बलविंदरसिंग बैंस यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, जरनैलसिंग नगगाल हे झाडूच्या चिन्हावर फगवाडा येथून तर विपन सूद हे मध्य लुधियानामधून लोक इन्साफ पक्षाचे चिन्हावर निवडणूक लढवतील.

आप आणि लोक इन्साफ पक्ष यांची आघाडी ही परस्परांच्या विश्‍वासावर आणि अद्वितीय अशी आहे, असे बैंस म्हणाले. वास्तविक जरनैल हे लोक इन्साफ पक्षात असले तरी ते आपच्या "झाडू' या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. राज्यात एक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदार आता शिरोमणी अकाली दल आणि भाजप आघाडीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत संजयसिंग म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आठ लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे हे आप आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. नोटाबंदीचा निर्णय हा अंबानी, अदानी आणि मल्ल्या यांच्या फायद्यासाठीच घेतल्याचे ते म्हणाले.

Web Title: AAP announces name of the candidates