'रावणाप्रमाणं मोदी सरकारला अहंकार होता, म्हणून त्यांनी कृषी कायदे आणले'

Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal
Summary

'स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शेतकऱ्यांची अवस्था खूपच वाईट आहे.'

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज (गुरुवार) कर्नाटकच्या (Karnataka) दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी बंगळुरूतील (Bangalore) जाहीर सभेत भाजप सरकारवर (BJP Government) जोरदार निशाणा साधलाय. केजरीवाल म्हणाले, रावणाप्रमाणं केंद्र सरकारलाही अहंकार होता, म्हणून त्यांनी 3 कृषी कायदे आणले. या सरकारला खूप समजावून प्रयत्न झाला, पण हे सरकार कोणालाही जुमानलं नाही, असा घणाघात त्यांनी केलाय.

केजरीवाल पुढं म्हणाले, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शेतकऱ्यांची अवस्था खूपच वाईट आहे. देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, या मोदी सरकारला (Modi Government) याचं काहीच देणं-घेणं नाहीय. देशातील 45 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, जर ह्या लोकांनी निश्चित केलं, तर सर्वात मोठं सरकार देखील पाडू शकतात, असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय.

Arvind Kejriwal
राहुल गांधी देशात द्वेषाची बीजं पेरत आहेत; केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप

आम्ही भ्रष्टाचार संपवण्यासाठी निवडणूक लढवली आणि दिल्ली, पंजाब जिंकलं. आता आमचं लक्ष कर्नाटकवर असून कर्नाटकात आम्हाला आपचं सरकार बनवायचंय. आम आदमी पार्टी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याचंही केजरीवालांनी शेवटी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com