AAP News: मोदींवरील टीका भोवली, गुजरातच्या 'या' नेत्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AAP News

AAP News: मोदींवरील टीका भोवली, गुजरातच्या 'या' नेत्याला अटक

नवी दिल्लीः आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांना दिल्ली पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे.

गोपाल इटालिया यांचा एक जुना व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलत आहेत. दुसऱ्या एका व्हीडिओत ते महिलांसंदर्भातदेखील चुकीचं वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यामुळे एनसीडब्ल्यूने त्यांना दिल्लीत चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी दिल्ली पोलिसांनी गोपाल इटालिया यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: शिंदेंच्या धक्क्यातून शिवसेना बाहेर! चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

सध्या गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी गुजरामध्ये चांगलेच लक्ष घातल्याचं दिसून येतंय. शिवाय आम आदमी पार्टीचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया हेदेखील चर्चेत आलेले आहेत. इटालिया हे गुजरातमधील पाटीदार समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं.