शिंदेंच्या धक्क्यातून शिवसेना बाहेर! चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

शिंदेंच्या धक्क्यातून शिवसेना बाहेर! चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

मुंबई- एकनाथ शिंदे शिवसेनेला जबर धक्का देत निम्म्याहून अधिक आमदार घेऊन बाहेर गेले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण पक्षात मरगळ आली होती. मात्र दोन निर्णय बाजुने गेलेल्या शिवसेनेत पक्षचिन्ह मिळाल्यापासून उत्साह दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी आज आपल्या भविष्यातील वाटचालीची चुनूक दाखवली आहे. छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Uddhav Thackeray news In marathi)

हेही वाचा: Rutuja Latke: 'मला जो त्रास दिला तोच ऋतुजा लटकेंना' ; काँग्रेसकडून उभा राहिलेल्या अभय पाटलांनी सांगितला किस्सा

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. चार महिने अधिक मिळाले असते, भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते. मात्र त्यांनी शिवसेना सोडली नसती तर आधीच मुख्यमंत्री झाले असते.

आता आपण धक्कप्रूफ झालो आहोत. जपानला भुकंप झाली नाही तर चर्चा होते,की आज झाला नाही. पण पहिला आणि मोठा धक्का होतो तो म्हणजे भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर, कुटुंबाला धक्का बसला. राग राजकारणाचा भाग झाला. मात्र आपला माणूस गेल्याने धक्का बसला होता. मात्र तुम्ही बाळासाहेब असताना सगळं मिटवून टाकलं हे चांगलं केल्याचं उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना उद्देशून म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackeray