पंजाबमधील "आप'चा उमेदवार कोट्यधीश

पीटीआय
बुधवार, 18 जानेवारी 2017

शेरगिल यांच्याकडे 4.54 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. चंडिगडमधील उच्चभ्रू भागात त्यांच्या नावावर निवासस्थान आहे.

अमृतस - पंजाबमधील मजिठा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार हिंमतसिंग शेरगिल (वय 37) यांच्याकडे चार कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. शिरोमणी अकाली दलाचे तुल्यबळ उमेदवार विक्रमसिंग मजिठिया यांच्या विरोधात शेरगिल लढत देत आहेत.

शेरगिल यांनी संपत्तीविषयीचे प्रतिज्ञापत्र आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यात त्यांच्या मालकीच्या मोटारीचे सध्याचे मूल्य तीन लाख रुपये दाखविण्यात आले आहे. या गाडीची शोरूम किंमत सात लाख आहे. शेरगिल यांच्याकडे 4.54 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. चंडिगडमधील उच्चभ्रू भागात त्यांच्या नावावर निवासस्थान आहे. तसेच त्यांच्या नावावर 9.72 लाखांचे कर्ज असल्याचेही म्हटले आहे.

उत्तर अमृतसरमधील भाजपचे उमेदवार व मंत्री अनिल जोशी यांची संपत्ती सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रिपद मिळाल्यानंतर जोशी यांनी डलहौसीनजीक दरकला येथे त्यांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांच्याकडे 1.26 कोटींची जंगम मालमत्ता असून, पत्नीच्या नावे 50 लाखांची संपत्ती असून, स्थावर मालमत्ता 1.32 कोटींची आहे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी अमृतसरमधील उच्चभ्रू भागात घर खरेदी केले असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले आहे. या घराचे सध्याचे मूल्य 65 लाख रुपये आहे.

Web Title: AAP has a millionaire candidate in Punjab