

AAP leader shot dead Jalandhar
Sakal
पंजाबच्या जालंधरमध्ये शुक्रवारी सकाळी आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्यानंतर त्यांना फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की ही घटना जालंधरच्या मॉडेल टाऊन परिसरात घडली. गुरुद्वाराबाहेर ओबेरॉय यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.