Sanjay Singh : ईडीचं नो ऑब्जेक्शन! 'आप'चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आपचे आणखी नेते अटक होतील, अशी भीती मंत्री आतिशी यांनी व्यक्त केली आहे.
Sanjay Singh : ईडीचं नो ऑब्जेक्शन! 'आप'चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

AAP News : 'आप'चे खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आम आदमी पक्षाला हा दिलासा समजला जातोय. जामिनासाठी ईडीने कसल्याचं प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं नसल्याने कोर्टाने जामीन मंजूर केला.

प्रकरण काय?

सन 2021-22 च्या दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये ईडीनं अटक केली. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात संजय सिंगांना अटक झाली होती.

Sanjay Singh : ईडीचं नो ऑब्जेक्शन! 'आप'चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर
Maidaan Trailer: "टीम इंडिया है हम..."; जिद्द आणि चिकाटीची गोष्ट, अजयच्या 'मैदान'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सुप्रीम कोर्टामध्ये संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. खंडपीठाने ईडीला विचारले होते की, संजय सिंह यांना अजूनही तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे?

संजय सिंग यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मनी लाँड्रिंगची पुष्टी झालेली नाही आणि मनी ट्रेल देखील सापडलेला नाही. असे असतानाही संजय सिंह ६ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. अखेर मंगळवारी ईडीने त्यांच्या जामिनाला कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे संजय सिंगांना जामीन मंजूर झाला.

मद्य धोरण प्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आपचे आणखी नेते अटक होतील, अशी भीती मंत्री आतिशी यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com