
AAP leader Saurabh Bharadwaj addressing the media as he challenges Indian cricketer SuryaKumar Yadav with sharp remarks.
esakal
AAP Leader Saurabh Bharadwaj’s Challenge to SuryaKumar Yadav: आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आव्हान दिलंय. त्यांनी म्हटलय की, सूर्यकुमार यादव जर तुझ्यात हिंमत असेल आणि BCCI व ICCची हिंमत असेल तर तुम्हाला आव्हान देतो आहोत की, जेवढा पैसा तुम्ही ब्रॉडकास्टिंग राइटमधून कमावला आहे...तो त्या २६ महिलांना देऊन टाका. मग आम्हीपण मान्य करू की, तुम्ही समर्पित आहात. पण हिंमत नाही यांची.
याशिवाय सौरभ भारद्वाज यांनी सूर्यकुमार यादव निशाणा साधत म्हटले की, सूर्यकुमार यादव यांनी या १४० कोटींच्या देशावर खूप मोठे उपकार केले की, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवले नाही. मला तर वाटतं त्याने जन्म घेऊनच भारतावर फार मोठे उपकार केलेत. हा तर त्यांच्याही पेक्षा महान आहे, ज्यांच्या मुलांनी सीमेवर बलिदान दिले आहे. भाजप त्याच्या महानतेचा ढोल बडवत आहे, भारत सरकारला वाटत असेल तर त्यांनी याला भारतरत्न द्यावं.
आम आदम पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले की, विरोधानंतरही भारताच्या केंद्र सरकारने भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना घडवून आणला. आम्हाला सांगितलं की, दुबईतील ते छोटसं स्टेडियम त्याची सर्व तिकीटं विकली गेली. तिकिटे खरेदी केल्यानंतर, भारतीयांचा आत्मा जागृत झाला आणि त्यांनी ठरवले की जर ते या भारत-पाकिस्तान सामन्याला गेले तर त्यांना नेहमीच देशद्रोही म्हटले जाईल.
याचबरोबर आम आमदी पार्टीचे नेत्यांनी दावा केलाय की, भाजपचे समर्थक देखील सोशल मीडियावर केंद्र सरकावर टीका करत होते. पहिल्यांदाच असं घडलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये मॅच झाली आणि मोठ्या सोसटींमध्ये मोठ्या स्क्रीनवर काही कार्यक्रम ठेवला गेला नाही. अनेक क्लबमध्ये हा सामना दाखवण्याचा प्रयत्न झाला. जिथे आमचे कार्यकर्ते पोहचले आणि मॅच न दाखवण्याचे आवाहन केले. बहुतांश ठिकाणी क्लब आणि रेस्टाँरंट मालकांनी म्हणणे ऐकले आणि मॅच नाही दाखवली. ही एक मोठी गोष्ट आहे.
यापुढे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, पब्लिकमध्ये या मॅचबाबत कोणतीही उत्सुकता दिसली नाही. भलेही म्हणायला भारत संघ जिंकला असेल, पण कोणताही विशेष उत्साह, जल्लोष दिसला नाही. या मॅचनंतर भाजपे स्क्रीप्टही बनवली की आरल्या कॅप्टनने त्यांच्या कॅप्टनशी हस्तांदोलन केले नाही. दिल्लीत कुठेही फटाके फुटले नाहीत. हे दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. भाजप सरकाला लोकांनी मोठा संदेश दिलाय.