सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे नायब राज्यपालांचे दुर्लक्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे तीन मंत्री या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यापैकी गृहमंत्री सत्येंद्र जैन व शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी उपोषणला सुरवात केली होती. यामुळेच जैन यांची प्रकृती खालावली व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 

नवी दिल्ली : मागचे आठ दिवस दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी उपोषण व धरणे आंदोलन करणारे मंत्री व आपचे नेते सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली असून त्यांना लोक नायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे सांगितले.  

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे तीन मंत्री या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यापैकी गृहमंत्री सत्येंद्र जैन व शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी उपोषणला सुरवात केली होती. यामुळेच जैन यांची प्रकृती खालावली व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. 

नायब राज्यपाल बैजाल हे या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्यांचा संप मिटवून कामावर रूजू व्हावे, घरपोच रेशन योजनेला परवानगी मिळावी या व अशा इतर मागण्यांसाठी आपच्या मंत्र्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.   
 
Web Title: AAP Minister satyendra jain On Fast Hospitalised