आपला झटका; अलका लांबा सोडणार साथ

 आपला झटका; अलका लांबा सोडणार साथ

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठा झटका बसणार आहे. चांदणी चौक विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या अलका लांबा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

अलका लांबा यांनी म्हटले आहे की, 2013 मध्ये सुरू झालेला प्रवास 2020 मध्ये समाप्त होणार आहे. पक्षाला माझ्या नेहमीच शुभेच्छा राहतील, सोबतच पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही मदत लागली तर तीही मी नक्की करेन. आशा आहे की, आम आदमी पक्ष दिल्लीत कायम मोठा पक्ष असेल. आम आदमी पक्षासोबतची सहा वर्षे अविस्मरणीय आहेत. पक्षात असताना खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. 

दरम्यान, अलका लांबा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यातील संबंध काही दिवसापासून ताणले गेले आहेत. आम आदमी पक्षाचा दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर पराभव झाल्यानंतर अरविंद केजरीवालांनी पक्षाच्या पराभवावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती, त्यावर अलका लांबा यांना पक्षाच्या आमदारांच्या व्हाट्सअप ग्रुपमधून त्यांना बाहेर काढण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com