'आप'चे आमदार ऋतुराज यांना अटक

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील काही मंत्र्यांना यापूर्वीही विविध प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली - छट पूजेदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार ऋतुराज यांना आज (रविवार) दिल्ली पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अमन विहार भागात शनिवारी छट पूजा साजरी होत असताना ऋतुराज यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी काही जणांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी ऋतुराज यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील काही मंत्र्यांना यापूर्वीही विविध प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. आता या यादीमध्ये आणखी एका आप आमदाराचे नाव सहभागी झाले आहे.

Web Title: AAP MLA Rituraj arrested