Arvind Kejriwal Government Delhi
Arvind Kejriwal Government Delhiesakal

Kejriwal Government : जैन, सिसोदियांच्या राजीनाम्यानंतर 'यांना' मिळणार मंत्रीपद; केजरीवालांनी एलजींकडं पाठवली नावं

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Published on
Summary

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रविवारी आठ तासांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयनं अटक केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे.

आमदार सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) आणि आतिषी (Atishi) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन्ही आमदारांची नावं लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडं पाठवली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Arvind Kejriwal Government Delhi
Kejriwal Government : SC चा निकाल येताच केजरीवालांना मोठा धक्का; सिसोदिया, जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा!

वास्तविक, मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांनीही दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. मनीष आणि सत्येंद्र यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळात दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे.

Arvind Kejriwal Government Delhi
BJP MLA : शिवरायांचे अनुयायीच निवडणूक जिंकतील, मुस्लिमांना चुकूनही मत देऊ नका; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रविवारी आठ तासांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयनं अटक केली. दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्यावतीनं सुरु केलेले नवे मद्य धोरण सिसोदिया यांच्या अटकेस कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. या धोरणावरुन सिसोदिया यांची याआधी देखील अनेकदा चौकशी झालेली आहे. उपमुख्यमंत्री सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचं कारण सीबीआयनं पुढे करत त्यांना अटक केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com