'आप'कडून आता "भाजप' लक्ष्य

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने (आप) आपल्या धोरणात बदल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख आता भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) वळवल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने (आप) आपल्या धोरणात बदल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख आता भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) वळवल्याचे दिसून येत आहे.

आत्तापर्यंत "आप'कडून पंतप्रधान मोदी यांना थेट लक्ष्य केले जात होते. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये "आप'ला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षाने आपल्या रणणितीमध्ये बदल केला आहे. आता "आप'कडून संपूर्ण भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. मोदी यांना लक्ष्य केल्यानंतरही "आप'ला पंजाब, गोवा आणि दिल्लीतील निवडणुकांमध्ये यश मिळाले नव्हते. त्यानंतर पक्षाने आपली रणनिती बदलली आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी "सीबीआय'ने छापा घातला होता. त्यानंतर हे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप "आप'कडून करण्यात आला होता. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर "सीबीआय'ने छापा टाकल्यानंतर त्यांनी थेट मोदींवर हल्ला चढवला होता. मोदी हे "सीबाआय'चा दुरुपयोग करत असल्याचे सांगत अतिशय तिखट शब्दांत केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली होती. मोदी यांच्याऐवजी "आप'कडून आता भाजपला लक्ष्य केले जात असल्याचे केजरीवाल यांच्या "ट्विट'वरील खाते पाहिले तरी दिसून येते.

Web Title: aap news marathi news arvind kejriwal sakal news