'आप'ची याचिका घटनापीठाकडे वर्ग

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- दिल्ली हे राज्य नाही आणि नायब राज्यपाल हे त्याचे प्रशासकीय प्रमुख आहेत, या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्लीच्या "आप' सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग केली आहे.

या प्रकरणात कायदा आणि घटनेशी संबंधित प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे या याचिकेचा निकाल सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी स्थापन केलेल्या घटनापीठावर अवलंबून असल्याचे न्या. ए. के. सिकरी आणि आर. के. आगरवाल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारने याचिकेबाबत या मोठ्या घटनापीठापुढे आपले म्हणणे मांडावे, असेही न्या. सिकरी आणि न्या. आगरवाल यांनी स्पष्ट केले.

दिल्ली सरकार आणि राज्यपाल यांच्या अधिकाराच्या वादाबाबत दिल्ली सरकारने ही याचिका दाखल केली आहे. अधिकाराच्या वादामुळे सरकारच्या कामावर परिणाम होत असल्याने या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या मोठ्या घटनापीठासमोर लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी "आप' सरकारने केली होती.

Web Title: AAP petition sent to court