निधीबद्दलची माहिती देण्याचे आपचे केंद्राला आवाहन

पीटीआय
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - आमच्या पक्षाने कोणाकडून निधी घेतला आहे याची माहिती केंद्राने द्यावी, असे आवाहन आम आदमी पक्षाने आज केंद्र सरकारला दिले. आमच्या पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने आपल्या चौकशी संस्थांना मागे लावले आहे. प्राप्तिकर विभागाला दिलेल्या देणगीदारांच्या यादीत काही त्रुटी होत्या, त्यात दुरुस्त्या करण्यात आल्याचे आपचे दिल्ली संयोजक दिलीप पांडे यांनी सांगितले.

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूचनेनुसार या प्रकारची कारवाई करण्यात येत आहे, त्यामुळे त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे नाही, असे ते म्हणाले. प्रत्येक वैयक्तिक आणि संघटनात्मक रिटर्न फाइल करण्याचा अधिकार आहे आणि अधिकारी त्यात त्रुटी दाखवू शकतात, कारण आम्ही आमची माहिती आमच्या संकेतस्थळावर ठेवली आहे, असे पांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

दिल्लीच्या 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने विदेशी संस्थांकडून निधी घेतल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भाजपचे सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांना क्‍लीन चिट दिली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: AAP requested funding details