esakal | ‘आपने माझ्या कामाची नेहमीच कदर केली’; सिद्धू यांच्या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

‘आपने माझ्या कामाची नेहमीच कदर केली’; सिद्धू यांच्या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण

‘आपने माझ्या कामाची नेहमीच कदर केली’; सिद्धू यांच्या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : ‘‘आम आदमी पक्षाने नेहमीच पंजाब बद्दलच्या माझ्या दृष्टिकोनाची आणि कामाची कदर केली. राज्यासाठी कोण खरा लढतो आहे हे त्यांना माहिती आहे,’’ असे ट्विट काँग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू यांनी आज केले. सिद्धू यांच्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिद्धू यांचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याबरोबर मतभेद आहेत. सिद्धू यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखविली आहे. तसेच नुकतीच त्यांनी दिल्लीत जाऊन प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सिद्धू मवाळ झाल्याचे बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर या ट्विटमुळे पुन्हा मतभेदांबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: साताऱ्याच्या ऑलिम्पियनचे आई-वडील खरे चॅम्पियन; PM मोदींची दाद

आपने माझी नेहमीच कदर केली आहे. बेअदबी, अमली पदार्थ, भ्रष्टाचार या समस्यांसह ऊर्जा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मी नेहमीच आवाज उठविला आहे. पंजाब मॉडेलबाबतही मी अनेकदा बोललो आहे. पंजाबच्या लोकांसाठी कोण भांडत आहे, हे त्यांना माहिती आहे, `` असे सिद्धू यांनी म्हटले आहे. विरोधकांनी मला प्रश्न विचारायचे धाडस दाखविले तर, माझ्या जनहिताच्या अजेंड्यापासून ते स्वतःला दूर ठेवू शकणार नाहीत, असेही सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सिद्धू यांनी २०१७मध्ये भाजप सोडताना अकाली दल आणि प्रकाशसिंग बादल यांच्यावर केलेल्या टीकेचा व्हिडिओ आपचे नेते संजयसिंह यांनी ट्विट केला आहे. त्याला उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये सिद्धू यांनी आपची भलामण केली आहे. या ट्विटमुळे ते आपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: राज्यात पुढच्या 5 दिवसांत अतिमुसळधार; हवामान खात्याचा इशारा

आप में आयोगे तो...

सिद्धू यांनी आणखी एक ट्विट केले आहे. तुम अगर आप (AAP) में आयोगे तो कोई बात नहीं...तुम अगर काँग्रेस में रहोगे तो मुश्किल होगी, असे विरोधी पक्ष माझ्याबद्दल आणि निष्ठावान काँग्रेस नेत्यांबद्दल म्हणत आहेत, असे ट्विटमध्ये सिद्धू यांनी म्हटले आहे.

loading image