शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकऱ्यांचा जीव गेला - सदावर्ते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही केली सडकून टीका
Sadavarte_Sharad Pawar
Sadavarte_Sharad Pawar

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee) जीव गेल्याचा आरोप आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratn Sadavarte) यांनी केला आहे. जोपर्यंत सरकारनं नेमलेल्या समितीची अहवाल येईल तोपर्यंत आणखी किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (ST Strike 67 hard working people lost their lives due to Sharad Pawar Gunaratn Sadavarte)

Sadavarte_Sharad Pawar
कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस ओमिक्रॉन, डेल्टावर भारी - भारत बायोटेक

सदावर्ते म्हणाले, " राज्य शासनाच्या नैराश्यामुळं आणि शरद पवार यांच्या अडमुठ्या धोरणामुळं ६७ कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. जोपर्यंत सरकारनं नेमलेल्या समितीचा अहवाल येईल तोपर्यंत आणखी किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार आहात. जर एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू थांबवायचे असतील तर तुम्ही आज अहवाल घेऊन या उद्याच यावर हायकोर्टात सुनावणी होईल आणि एसटीच्या विलिनिकरणाचा निर्णय कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं येईल"

पवार कर्मचाऱ्यांसमोर क्लीनबोल्ड

शरद पवारांनी कृती समितीसोबत बैठकीनंतर असं दाखवलं की, त्यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांसमोर ते क्लीनबोल्ड झाले. इंग्रजांनीही कधी कलम १५१ नुसार कारवाई करताना कोणालाही सकाळी झोपेतून उठवून नेलं नाही ते राज्य शासनानं केलं. नाशिकच्या १२ ते १६ कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवून नेण्यात आलं. शरद पवार कर्मचाऱ्यांसमोर क्लीन बोल्ड झाल्यामुळंच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसी ताकदीचा गैरवापर केला. जय श्रीराम आणि जय भीम म्हणणाऱ्या कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांना जुमानलेलं नाही. शरद पवारांना कष्टकऱ्यांसमोर येऊन तोंड दाखवण्यासाठी जागा राहिलेली नाही, असं मी ठणकावून सांगत आहे, असंही सदावर्ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनाच अंतिम निर्णय घ्यायचा आहे

हायकोर्टानं जे बारा आठवडे दिले होते ते आम्हाला लागणार नाहीत. वारंवार सांगितलं जातंय की विलिनिकरणाच्या अभ्यासासाठी नेमलेली तीन सदस्यीय समितीत सनदी अधिकारी आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं की, कायदेमंडळाचे प्रमुख म्हणून तुम्हाला यावर निर्णय घेण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळं यावर निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. विलिनिकरणाबाबत ते कोर्टात सकारात्मक निर्णयच देतील. पण याला शरद पवारांच्या अडमुठेपणामुळं उशीर होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com