
दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे महत्त्वाचे नेते मनिष सिसोदिया हे तब्बल १५७६ मतांनी पिछाडीवर आहेत. दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूकीच्या रिंगणात होते.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपच्या अरविंद केजरीवालांनाच पसंती दिली आहे. मात्र, दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे महत्त्वाचे नेते मनिष सिसोदिया हे तब्बल १५७६ मतांनी पिछाडीवर आहेत. दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूकीच्या रिंगणात होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भाजप १५ ते १९ जागांवर पुढे असून पटपडगंज विधानसभा मतदासंघातून भाजपने चक्क आपच्या उपमुख्यमंत्र्यांनाच पिछाडीवर टाकले आहे. या मतदारसंघातून भाजपचे रवी नेगी हे निवडणूकीच्या रिंगणात होते. सिसोदियांना मागे टाकत नेगींनी १५७६ मतांनी आघाडी मिळवली. सकाळच्या टप्प्यातील मतमोजणीत सिसोदियांनी मोठी आघाडी घेतली होती, मात्र ११ नंतरच्या मतमोजणीत नेगींनी सिसोदियांना पिछाडीवर टाकले. मात्र दुपारनंतरच्या टप्प्यात पुन्हा एकदा सिसोदियांना आघाडी मिळेल अशी चर्चा आहे.
#Update: Aam Aadmi Party's Manish Sisodia trailing behind BJP's Ravi Negi by 1576 votes, in Patparganj assembly constituency, after fifth round of counting.
— ANI (@ANI) February 11, 2020
केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!
आपच्या सरकारमध्ये मनिष सिसोदियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपाची आहे. आप सरकारच्या प्रशासनामधील आदारस्तंभ म्हणून मनिष सिसोदिया यांच्याकडे बघितले जाते. तसेच, केजरीवालांसाठी विश्वासून नेत्यांमध्ये सिसोदियांचे नाव प्रथम येते. त्यामुळे या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Delhi Elections:अच्छे होंगे पाँच साल, दिल्ली मे तो केजरीवाल!
आपचा जल्लोष
सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे.