Delhi Elections:अच्छे होंगे पाँच साल, दिल्ली मे तो केजरीवाल!

टीम ई-सकाळ
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

क्झिट पोलमधील सर्व अंदाज खरे ठरवत आज, आम आदमी पक्षाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीत 67 जागांवर विजयी झालेला आम आदमी पक्ष यावेळी थोड्या कमी जागांवर विजयी होण्याची शक्यता दिसत आहे.

नवी दिल्ली Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्वच्या सर्व जागांचे कल आता हाती येऊ लागले आहेत. त्यात भाजपच्या गेल्या वेळच्या जागांच्या तुनलेत वाढ होताना दिसत आहे. तर, आम आदमी पक्ष 67 जागांवरून खाली येताना दिसत आहे. तरीही दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचेच सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - निकालापूर्वीच भाजपनं मान्य केला पराभव

क्झिट पोलमधील सर्व अंदाज खरे ठरवत आज, आम आदमी पक्षाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीत 67 जागांवर विजयी झालेला आम आदमी पक्ष यावेळी थोड्या कमी जागांवर विजयी होण्याची शक्यता दिसत आहे. पण, हा बदल अपेक्षित असला तरी, दिल्लीत पुन्हा आपचीच सत्ता येणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळं आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण दिसत आहे. निकालांचे कल जाहीर होत आहेत. त्यानुसार आपला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 15-20 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप तीन जागांवरून 15-20 जागांवर विजय मिळवत असल्यानं भाजपसाठी ही सकारात्मक बाब आहे. पण, दिल्लीत सत्तांतर करण्यात भाजपला अपयश येत असल्याचं दिसत आहे. 

आणखी वाचा - काँग्रेसला भोपळा, भाजपच्या जागा वाढणार

केजरीवाल आघाडीवर पण...
अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपचे सुनील यादव जोरदार टक्कर देत आहेत. केजरीवाल सध्या आघाडीवर असले तरी ती आघाडी 2 हजार मतांच्या आसपास आहे. त्यामुळं नवी दिल्लीत केजरीवाल विरुद्ध यादव अतिशय चुरशीची लढत पहायला मिलत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi election 2020 arvind kejriwal will be cm for third time