Election Result : सलमानच्या घरी जल्लोष! सलीम खान यांच्या व्याह्याने जिंकली निवडणूक

Salman Khan Family
Salman Khan Family

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील मंडी मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र अनिल शर्मा यांनी विजय मिळवला आहे. अनिल शर्मा यांच्या विजयानंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता आयुष शर्मा याने शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष सलीम खान यांचा जावई असून एकप्रकारे सलीम खान यांच्या व्याह्यांनीच निवडणुकीत विजय मिळवला आहे. (aayush sharma father anil sharma won himachal election )

Salman Khan Family
Himachal Congress Victory: प्रियंका गांधींनी एक दिवस आधीच दिलं आईला बड्डे गिफ्ट, ठरल्या विजयाच्या शिल्पकार

भाजपच्या अनिल शर्मा यांनी काँग्रेसच्या चंपा ठाकूर यांचा 10 हजार 6 मतांनी पराभव केला. आयुष शर्माने हिमाचलप्रदेशातील आपल्या मूळ गावी मंडीमध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्याबद्दल वडिलांचे अभिनंदन केले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होताच. आयुष शर्माने वडील अनिल शर्मा यांच्यासाठी अभिनंदनाचा संदेश शेअर केला आहे.

आयुष शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, वारसा कायम जिवंत राहतो. पप्पांचे अभिनंदन आणि आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवल्याबद्दल मंडीच्या सर्व मतदारांचे आभार.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

Salman Khan Family
Gujarat Election Result : हार्दिक पटेलच्या निकालाचा दाखला अन् अजित पवारांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले…

राजकीय वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित घराण्यातून आलेला आयुष शर्मा हा माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पंडित सुखराम शर्मा यांचा नातू आहे. सुखराम शर्मा यांचे याचवर्षी मे महिन्यात निधन झाले. आयुष शर्माचे आजोबा हे देशातील दिग्गज राजकारण्यांपैकी एक आहेत. भारतात दूरसंचार क्रांती घडवून आणण्यासाठीही ते ओळखले जातात.

दरम्यान हिमाचलप्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर असून काँग्रेसने मुसंडी मारली आहे. अर्थात हिमाचलप्रदेशात काँग्रेस सत्तास्थापनेकडे वाटचाल करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com