'अभिनंदन यांच्या मिशा 'राष्ट्रीय मिशा' जाहीर करा'

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडल्यानंतर त्यांचे मिशामधील छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. शिवाय, देशभरातील अनेकांनी त्यांच्या मिशांची स्टाइल केली आहे.

नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता. 17) पासून सुरूवात झाली आहे. अधिवेशना दरम्यान सहाव्या दिवशी चौधरी यांनी अभिनंदन यांना पुरस्कार देण्याची मागणी लोकसभेत केली. शिवाय, अभिनंदन यांच्या मिश्यांची स्टाइल ही 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी काँग्रेसच्या वतीने केली. अभिनंदन यांना पाकिस्तानने पकडल्यानंतर त्यांचे मिशामधील छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. शिवाय, देशभरातील अनेकांनी त्यांच्या मिशांची स्टाइल केली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 26 फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी हल्ल्यांवर हवाई दलाद्वारे कारवाई केली होती. 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर अभिनंदन यांचे एफ 16 हे फायटर विमान पाकिस्तानने पाडले होते. अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी नागरिकांच्या ताब्यात सापडले होते. पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाकिस्तानी सैनिकांनी अभिनंदन यांची नागिरकांच्या तावडीतून सुटका केली. भारताने पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांची 60 तासानंतर सुटका केली होती. दरम्यानच्या काळात अभिनंदन यांचे मिशातील छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhinandan Varthamans Moustache Must be Made National Moustache Demands Congress Adhir Ranjan Chowdhary in Lok Sabha