गोव्यात कॉंग्रेसचा निकष जिंकून येण्याच्या क्षमतेचा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नवी दिल्ली : उमेदवारी देताना "एका कुटुंबात एकच व्यक्ती' हा राहुल गांधींचा निकष कॉंग्रेसने पंजाबमध्ये कसाबसा पाळला असला, तरी गोव्यात मात्र सोईचे निकष तयार केले आहेत. "जिंकून येण्याची क्षमता' या निकषानुसार कॉंग्रेसने आज गोव्याची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एका घरात एकापेक्षा अधिक उमेदवार असतील, तर चार माजी मुख्यमंत्रीही निवडणूक रिंगणात असणार आहेत.

मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढतील, तर त्यांचे पुत्र आणि व आमदार विश्‍वजित राणे हे वाळपईमधून निवडणूक लढतील. मावळत्या विधानसभेतील आमदार चंद्रकांत कवळेकर यंदाही केपे मतदारसंघामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार असतील, तर त्यांच्या पत्नी सावित्री यांना सांगे येथील उमेदवारी कॉंग्रेसने दिली आहे. अशाच प्रकारे मॉन्सेरात दाम्पत्यही रिंगणात आहे. ऍन्टानासियो ऊर्फ बाबुश मॉन्सेरात हे "युनायटेड गोवन्स पक्षा'चे पणजीमध्ये उमेदवार आहेत, तर त्यांच्या पत्नी जेनिफर यांना कॉंग्रेसने ताळगाव येथून उमेदवारी दिली आहे. बाबुश मॉन्सेरात यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया हे सांत आंद्रे मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री रवी नाईक, दिगंबर कामत, लुईझिनो फालेरियो हे अनुक्रमे फोंडा, मडगाव आणि नावेली या मतदारसंघांमधून निवडणूक लढतील. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकरही शिरोडा मतदारसंघातून लढतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि "युनायटेड गोवन्स' या दोन पक्षांशी कॉंग्रेसची आघाडी आहे.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या कॉंग्रेसने 77 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. आज 23 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. 17 मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अद्याप ठरलेली नसल्याचे कळते. "एका कुटुंबात एकच उमेदवारी' हा निकष पाळत कॉंग्रेसने पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योतकौर यांना अमृतसर पूर्व येथून उमेदवारी दिली आहे.

Web Title: ability to win is criterion of goa congress