"आतापर्यंत देशात साडेचार कोटी मुलांचे लसीकरण"

एक कोटीहून अधिक मुलांनी त्यांची मन की बात पोस्ट कार्डमधून पाठवली असल्याचं मोदींनी सांगितलं.
PM Narendra Modi
PM Narendra Modiटिम ई सकाळ

भारतात कोरोनाची नव्या लाटेने थैमान घातले आहे. संपुर्ण देश कोरोनाच्या या लाटेचा यशस्वीपणे सामना करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. आतापर्यंत देशात जवळपास 4.5 कोटी मुलांनी कोविड लस घेतली आहे आणि ही अभिमानाची बाब असल्याचे सुध्दा नरेंद्र मोदी म्हणाले. ते ‘मन की बात’ मध्ये बोलत होते.

भारत कोरोनाच्या नव्या लाटेशी अत्यंत यशस्वीपणे लढत आहे. आतापर्यंत जवळपास 4.5 कोटी मुलांनी कोविड लस (Covid Vaccination) घेतली आहे आणि ही अभिमानाची बाब असल्याचे नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘मन की बात’ मधून देशातील तरूणांना मणिपूरमधील २४ वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंहचं (Thounaojam Niranjoy singh) उदाहरण देत या युवकाकडून प्रेरणा घेण्याचंही आवाहन केलं. थौनाओजमने १ मिनिटात तब्बल १०९ पुश अप्स काढत विक्रम केलाय

PM Narendra Modi
राष्ट्रपती कोविंद, PM मोदींनी राजघाटावर गांधीजींना वाहिली श्रद्धांजली

इंडिया गेटजवळ असलेली अमर जवान ज्योती आणि तिथून जवळ असणारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात असलेली ज्योती दोन्ही एकत्र करण्यात आल्या. या भावूक क्षणी अनेक देशवासी आणि शहीद कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते असं मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाले.

PM Narendra Modi
बापूंच्या खादीला विसरलो, पण गुजरातचे सुपूत्र नरेंद्र मोदींनी... : अमित शाह

देशभरातील एक कोटीहून अधिक मुलांनी त्यांची मन की बात पोस्ट कार्डमधून पाठवली असल्याचं मोदींनी सांगितलं. ते म्हणाले की, ही पोस्ट कार्ड देशासह परदेशातून मिळाली आहेत. या पोस्ट कार्डमध्ये देशातील तरुणांचे मोठे ध्येय दिसते. ऋद्धिमा नावाच्या मुलीने दहशतवादमुक्त आणि सशक्त भारत बघायचाय असं पोस्ट कार्डमध्ये म्हटल्याचं मोदींनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com