बापूंच्या खादीला विसरलो, पण गुजरातचे सुपूत्र नरेंद्र मोदींनी... : अमित शाह

Amit Shah on Mahatma Gandhi Death Anniversary
Amit Shah on Mahatma Gandhi Death Anniversarye sakal

अहमदाबाद : महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) आपल्याला खादीचं महत्व समजावून सांगितलं. त्यांनी खादीला चालना दिली. पण, दुर्दैवाने आपल्याला खादीचा विसर पडला आहे. हे गुजरातचे सुपुत्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत ज्यांनी खादीच्या कल्पनेला पुढे करून 'खादी'चे पुनरुज्जीवन केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) म्हणाले. आज महात्मा गाधींच्या पुण्यातिथीनिमित्त ते अहमदाबाद येथे बोलत होते.

Amit Shah on Mahatma Gandhi Death Anniversary
''पंजाबमधील घटनेमागे अमित शाह यांचा तर हात नाही ना?''

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी अहमदाबादमधील साबरमती येथे 2,975 मातीच्या कुल्लड (मातीच्या कप) पासून बनवलेल्या महात्मा गांधींच्या भव्य भित्तीचित्राचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे आयोजित करण्यात आला आला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल देखील उपस्थित आहेत.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कुंभारांना सक्षण करण्यासाठी कुंभार सशक्तिकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. देशभरातील ७५ कुंभारांनी हे भित्तीचित्र साकारलं असून १०० चौरस मीटरचे हे भित्तीचित्र आहे. महात्मा गांधींचे दर्शन घडविण्यासाठी हात्माजींचे दर्शन घडविण्यासाठी अॅल्युमिनियमच्या शीटवर कुल्लडांची मांडणी करून तयार करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com