esakal | राजस्थानात राजकीय हालचालींना वेग, प्रियंका गांधी यांचा पायलट यांना फोन
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थानात राजकीय हालचालींना वेग, प्रियंका गांधी यांचा पायलट यांना फोन

राजस्थानात राजकीय हालचालींना वेग, प्रियंका गांधी यांचा पायलट यांना फोन

sakal_logo
By
सागर शेलार

जयपूर : ः उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे युवा नेते जितीनप्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राजस्थानात सचिन पायलट आणि त्यांच्या गोटातील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. मागील वर्षी पक्षाने दिलेली आश्‍वासने दहा महिन्यानंतर देखील पूर्ण केली नसल्याचे सांगत पायलट यांनी नाराजी व्यक्त केली होती. पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून संवाद साधला. यानंतर पायलट आज दिल्ली रवानाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: जगाला एक अब्ज डोस पुरविणार : बोरीस जॉन्सन

दुसरीकडे पायलट समर्थक आमदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे बोलले जाते. आता केवळ पाचच आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आला आहे. जयपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सचिन पायलट यांनी रिटा बहुगुणा जोशी यांच्याशी भाजपप्रवेशाबाबत चर्चा झाल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

चौधरी पायलट यांना भेटले- राजस्थानच्या विधानसभाअध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून देणारे काँग्रेसचे आमदार हेमराम चौधरी यांनी शुक्रवारी रात्री सचिन पायलट यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. बारमेर जिल्ह्यातील गुधामलानी मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. मागील वर्षी ज्या अकरा आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते त्यात चौधरी यांचाही समावेश होता. चौधरी हे पायलट यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

हेही वाचा: कोरोनाने डाकसेवकाचा मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार नोकरी; मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय